यामध्ये श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयातील 100 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला यांमध्ये विद्यालय मधून प्रथम क्रमांक कु. नाविन्या लाकडे (वर्ग 8) द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांक. .कु.सोनाली बहादुरे (वर्ग 7 वा) तृतीय क्रमांक कु. अनुश्री राऊत (वर्ग 8वा) या सर्वांनी पटकावला .

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनिता देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे यशस्वी आयोजन कलाशिक्षक विजय पाटणकर यांनी मुख्य भूमिका सांभाळली सर्व विजेत्या विद्यार्थिनींना बक्षीस समारंभ सोहळा दिनांक 20 सप्टेंबर 2025 शनिवार नगरपरिषदेच्या प्रांगणात पार पडला या कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रातील युवा कार्यक्षम आमदार सन्मा.प्रताप दादा अडसड ,धामणगावचे तहसीलदार सन्मा.अभयजी घोरपडे , नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पुनम ताई कळंबे धामणगाव शहर अध्यक्ष दर्शनजी राठी, हिराबाई गोयनका कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीताताई देशपांडे धामणगाव भाजप सेनेचे सरचिटणीस अशोकजी शर्मा भाजप युवा सेनेचे शहराध्यक्ष निवृत्ती लोखंडे हे सर्व व्यासपीठावर उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनीचा व त्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे कलाशिक्षक विजय पाटणकर यांना सन्मानित करण्यात आले.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दि जयंतीच्या निमित्ताने ब्र निमित्ताने विद्यालयातील ७वीतील कु. श्रावणी तितरे,कु. सोनाक्षी गंधे ९ वी यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली कार्यक्रमचे संचालन केंद्रप्रमुख श्री गोंडीक सर यांनी केले याप्रसंगी नगर परिषदेच्या कार्यलयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते हा कार्यक्रम धामणगाव नगरपरिषेमध्ये संपन्न झाला*













