होल्टेजच्या कारणामुळे घरगुती उपकरणे खराब झाल्याने प्रभाग क्रमांक आठ मधील जनता त्रस्त.
प्रभाग क्रमांक आठ वार्ड नंबर 13 येथील लाईनीचे होल्टेज कमी असल्याने अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे खराब झाले असल्यामुळे
गेल्या काही महिन्यांपासून प्रभाग क्रमांक आठ येथील लवटे, सोनवणे, बागल, सोनार, पाचंगणे, गुप्ता, राऊत, वलथरे, अजय उपरीकर, राऊत, धोटे, पतालिया, ललित पवार, अशा अनेक परिवारातील घरांमध्ये व्होल्टेज च्या कारणाने अनेक उपकरणे खराब झाले आहे. आणि त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने याची जबाबदारी एम एस ई बी प्रशासन घेईल का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.
तरीसुद्धा आपण या निवेदनाची तातडीने दखल घेऊन संबंधित नागरिकांचा प्रश्न सोडवावा, अन्यथा येणाऱ्या काळात आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल व त्याकरिता सर्वस्वी जबाबदार एम एस ई बी प्रशासन राहील असे युवक काँग्रेसच्या माध्यमातून निवेदनाद्वारे लक्षात आणून देण्यात आले.
यावेळी उपस्थित युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष आशिष शिंदे, ज्ञानेश्वर सोनवणे, शैलेश लवटे,विजय गुप्ता, मंजू गुप्ता, विजय सोनवणे, राजू गुप्ता, अजय उपरीकर, पवन भोसले, तुषार उपरीकर, किशोर तुपात, गजानन पाचंगने, पुरुषोत्तम वलथरे, रामकृष्ण उपरीकर, सुरेश गुप्ता, सुमन वाघाडे, सिंधुबाई बागल, विजय मंडले, कमला ठाकरे, टिल्लू गुप्ता, सुभाष राऊत, नरेश राऊत अशा अनेक लोकांनी मिळून युवक काँग्रेसच्या नेतृत्वात एम एस ई बी प्रशासनास निवेदन दिले.