पहलगाम येथील हल्ल्याचा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कडून तहसील कार्यालयात तहसीलदार याना दिले निषेध निवेदन

0
10
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे:

जम्मू कश्मीर येथील पहेलगाम मध्ये इस्लामी आतंकवादी भ्याड हल्ल्यामुळे 27 भारतीयांना आपला जीव गमवावा लागला या या घटनेने संपूर्ण भारतीय जनमानस आक्रोशित झाले असताना विश्व हिंदू परिषद बजरंग दल धामणगाव प्रखंड तर्फे धामणगाव रेल्वे येथील तहसील दार यांना निवेदनात्मक निषेध नोंदविण्यात आला. विविध मागण्या व निषेध निवेदन घेऊन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते तहसील कार्यालयात दाखल झाले. पाकिस्तान प्रेरित इस्लामी आतंकवादाने संपूर्ण जग त्रस्त आहे व त्याचा सर्वात जास्त झळ ही भारताला पोहोचते आहे. कश्मीर येथील पहेलगांमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या लोकांना धर्म विचारून ते हिंदू आहेत की मुस्लिम आहेत हे पाहून जे हिंदू पर्यटक होते त्यांना टार्गेट करून त्यांची नृशंस हत्या करण्यात आल्याने धर्मनिरपेक्षता या शब्दावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल व छत्रपती शासन संघटना तसेच अनेक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या हिंदू संघटनांनी या निवेदनात स्पष्ट उल्लेख केला आहे

की पाकिस्तान आतंकवाद्यांना योग्य तो धडा शिकवलाच पाहिजे व या हल्ल्याचा बदला निश्चितपणे घेतला पाहिजे अशी मागणी सरकार दरबारी त्यांनी केलेली आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल व छत्रपती शासन संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

veer nayak

Google Ad