मागील पाच वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यात वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम तसेच महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता सदैव अग्रेसर राहुन भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असतात यावर्षी वसुंधरा फाउंडेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी यवतमाळ शहरातील उत्सव मंगल कार्यालय जाजु चौक यवतमाळ येथे महिलांकरिता कराओके गीत गायन स्पर्धा व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दीपक शिरभाते डॉ. सारिका शहा डॉ. अंजली गवांर्ले, माजी जिल्हा परिषद सदस्य रेणू शिंदे, आर.एम जिम च्या संचालिका राणी जयस्वाल डॉ. नेहा पडवळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
कराओके गीत गायन स्पर्धेत 1 st प्रीती ठोंबरे 2 nd. पुजा धोटे 3rdअपर्णा वासनिक,प्रोत्साहन पर 1) शिवानी कुलकर्णी ,2) निकिता पारेख,तसेच एकल नृत्य 10 ते 20 वयोगट 1st भूमिका काटपेलवार ,2 nd अक्षता मोहोड,3 rd प्रिया कुरडकर प्रोत्साहन पर 1) श्रुती हजारे 2) काव्या पोरटकर, एकल नृत्य 20 ते खुला वयोगट 1 st आरती गंगासागर, 2 nd माधवी इखार, 3 rd गायत्री सनेसर, प्रोत्साहन पर 1) मोहिनी तलवारे 2) भक्ती भोरे यांनी पारितोषिक पटकावले. समूह नृत्य 1st ईश्वरी आणि ग्रुप,..2nd. 6लेडीज आणि ग्रुप,
राणी दुर्गावती ग्रुपला प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले.
नृत्य स्पर्धेचे पहिले पारितोषिक अनिता वऱ्हाडे यांच्या कडून दिले. या कार्यक्रमांमध्ये गायन स्पर्धेमध्ये 35 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता तर नृत्य स्पर्धेमध्ये एकूण 25 स्पर्धक,सोलो व समूह स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून अमित राऊत, श्रीकांत टकले, रीतीक पाटील,गायत्री व्यास, शितल लाड आर्णी आदींचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्ष वर्षा पडवे यांचे सह निर्मला आडे,मीनाक्षी गाढवे, रूपाली हांडे, नीलम डोंगरे, प्रिया गायनर,नेहा शर्मा यांचे कडून बक्षीस वितरित करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता नागोसे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्मिता ढेकळे सचिव यांनी केले..उज्वला जाधव, स्विटी निखाडे,स्नेहा तुरकर प्रतिभा गोरडे, सुवर्णा भगत,शिल्पा मस्के दिपा गुल्हाने, वर्षा चौधरी,मीनल मेहता,कविता सुलभेवार, अँड प्रीती पोरोटकर,सुहानी पडवे,श्रिया कांडूरवार,साची शर्मा यांनी सहकार्य केले.
Home आपला विदर्भ अमरावती वसुंधरा फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त गीत गायन स्पर्धा व भव्य नृत्य स्पर्धा संपन्न