समतेचा संदेश – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम”
धामणगाव रेल्वे: धामणगाव रेल्वे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास शाळेच्या प्रि. प्रायमरी हेड शबाना खान व संपूर्ण शिक्षक उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर त्यांच्या जीवन कार्याची व विचारांची माहिती देण्यात आली.
बाबासाहेबांचा जीवनसंघर्ष, त्यांनी दिलेले शिक्षण आणि आजच्या पिढीसाठी त्याचे महत्त्व सखोलपणे अधोरेखित करण्यात आले. राज्यघटनेतील मूल्ये आणि सामाजिक समतेचे महत्त्व समजावून सांगितले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे बहुआयामी योगदान समजून घेता आले. त्यांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन सामाजिक उत्तरदायित्व व समता ही मूल्ये अंगीकारण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका प्रणिता जोशी, आकांक्षा महल्ले, श्रद्धा राय, अश्विनी नांदणे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.