राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांच्या शिष्यवृत्ती परीक्षेत से.फ.ला. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश..

0
89
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

 धामणगाव रेल्वे – तालुका प्रतिनिधी 

 धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात डिसेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच लागलेला असून यात से.फ.ला. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. विद्यालयातील इयत्ता आठवीचे 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 4 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.. यश प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सम्यक दिनेश अर्जुने, हर्षदा विलासराव भिल, आदित्य सुनील बिजवार,शार्दुल निलेश अजमिरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असून या विद्यार्थ्यांना पुढील 4 वर्ष शिष्यवृत्ती मिळणार आहे…

 याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे,उपप्राचार्य प्रदीप मानकर, पर्यवेक्षक अनिल लाहोटी व शिष्यवृत्ती परीक्षा प्रभारी शिक्षक चेतन पिंपळे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. वरील सर्व यश प्राप्त विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे..

 दिनांक -19 एप्रिल 2025

 शनिवार

veer nayak

Google Ad