जळका (पटाचे) येथे हनुमान जयंतीच्या पर्वावर ओढले गाळे. ७२ वर्षाची परंपरा कायम: कंगाले कुटुंबाची अविरत सेवा.              

0
5
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे :- मागील ७० वर्षांपासून बिनबैलाचे गाडे ओढण्याची परंपरा तालुक्यातील जळका पटाचे या गावात कायम असून शनिवारला कंगाले कुटुंबातील तिसर्या पिढीतील सदस्य ११ गाडे ओढले आहे.                                     

तालुक्यातील ३ हजार लोकवस्तीचे जळका पटाचे हे शेतकरी, शेतमजुराचे गांव म्हणून ओळखले जाते. या गावात लक्ष्मीमाता व तेलंगामाता असे एकाजवळ एक दोन मंदिर आहेत. गावातील प्रत्येक ग्रामस्थ या मंदिरात पूज्या केल्याशिवाय आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करीत नाही.  

मागील ३ पिढ्यापासून कंगाले कुटुंबातील सदस्य वारसाप्रमाणे गाडे ओढण्याचे काम करतात. हनुमान जयंतीच्या पर्वावर दामाजी कंगाले हे गाडे ओढत असते. त्यापूर्वी त्यांचे वडील याच दिवशी गाडे ओढण्याचे अविरत कार्य करीत होते.                              

दामाजी यांनी वयाच्या ७०व्या वर्षापर्यंत गाडे ओढले. त्यांच्या निधनानंतर आता दामाजीचा मुलगा पंडित मागील ४ वर्षापासून आपल्या वारसांची परंपरा जपत गाडे ओढण्याचे कार्य करत आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖ रात्री होतेय यात्रा महोत्सवाला सुरुवात हनुमान जयंतीच्या पर्वावर जळका पटाचे हे गाव रोषणाईने प्रकाशमय होते. लक्ष्मी आणि तेलंगामाता या दोन्ही मंदिरात पुजारी पंडित कंगाले यांनी अभिषेक केल्यानंतर रात्री यात्रा महोत्सव व गाडे ओढण्याचे प्रक्रियेला सुरुवात होते. गावाला तबबल एक किलोमीटरचे परिब्रमन करण्यात येते. या गाड्यात अनेक भाविक बसतात.एक तासाच्या या धार्मिक कार्यक्रमाला तालुक्यातील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गावातील लक्षमी व तेलंगामाता यात्रा महोत्सवाची सर्व समाजातील ग्रामस्थ अथक परिश्रम घेत आहे.

veer nayak

Google Ad