अमरावती – धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव धांदे येथील तेजस्विनी संतोष लोणकर हिचा अखिल भारतीय अमरावती विद्यापीठ मलखांब संघात निवड झाल्याबद्दल २ फेब्रुवारी रोजी तिच्या मूळ गावी भव्य सत्कार होणार आहे.
मेहनतीच्या जोरावर मिळवली निवड!
तेजस्विनीने श्री शिवाजी शारीरिक शिक्षा महाविद्यालयात शिक्षण घेत मलखांब क्रीडेमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले. विद्यापीठ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत कलर कोट मिळवत अखिल भारतीय संघात स्थान मिळवले आहे.
गावाचा अभिमान – भव्य सत्कार समारंभ!
बोरगाव धांदे गावात दुर्गा माता मंदिर सभागृहात तिचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत तेजस्विनी आणि तिच्या कुटुंबाचा प्राध्यापक डॉ. अमित धांदे, शिक्षक रविंद्र नाचणे, अंकुश उईके, क्रीडाशिक्षक रंजित धोटे, सरपंच श्रुती उईके, आर्मी कमांडर अमित मुडे यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे.
गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन!
कार्यक्रमाचे आयोजक विक्रम उईके, देवानंद मेश्राम, प्रवीण सवाळे यांनी गावातील सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.