पहिले राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलन मंगरूळ चव्हाळा येथे श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयाची बाजी

0
42
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयाने मंगरूळ चव्हाळा येथे आयोजित पहिले राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलनामध्ये नाट्यविष्कार स्पर्धेत रोख रक्कम 5000 चे पारितोषिक पटकाविले. अमृत महोत्सवी वर्षात श्रीमती हिराबाईगोय 

गोयनका कन्या विद्यालयाने शिरपेचात मानाचा तुरा रोवला.AI की ए आई ?या नाटिकेने राज्यस्तरवर दुसरा क्रमांक प्राप्त केला.तसेच उत्कृष्ट अभिनया करिता प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कु. दिशा विनोद ठोंबरे हिला प्राप्त झाले. या नाटिकेचे लेखक व दिग्दर्शक विद्यालयाचे शिक्षक श्री चंद्रशेखर वडगिरे यांनी केले त्याबद्दल त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचे राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त झाले. प्रसिद्ध कवी ,साहित्यिक श्री अनंत राऊत व प्रसिद्ध साहित्यिक श्री किशोर बळी यांच्या हस्ते प्राप्त झाले. या नाटिकेमध्ये दिशा विनोद ठोंबरे, नेहा हरी सावंत, लक्ष्मी चंदू डहाणे, अनुष्का विनोद चौधरी, जानवी गजानन गव्हाणे, अनुष्का अमोल टवळे, अक्षरा दीपक भगत, अक्षरा चंद्रशेखर शेलोकर ह्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.श्री रमेशचंद्रजी चांडक, शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. सौ.शोभादेवी राठी,सचिव ॲड.आशिषजी राठी ,सहसचिव डॉ. असितजी पसारी तसेच धा . ए. सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व यशस्वी चमूचे शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले.तसे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री.बाळू राठोड, पर्यवेक्षिका कु.रजनी टेंभुर्णे तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी चमूचे खूप अभिनंदन केले.

veer nayak

Google Ad