0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

सावंगा विठोबा नगरीत भाविकांसाठी दर रविवारी चांदुर रेल्वे आणि अमरावती येथून “एस.टी.बस सेवा”

अमरावती जिल्हात चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे भाविकांना दर्शनाकरिता सुरक्षित प्रवास सुविधा देण्याचे दृष्टीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वतीने चांदुर रेल्वे आगर मधून दर रविवारी सावंगा (विठोबा) करिता चांदुर रेल्वे आणि अमरावती बसस्थानक मधून ४ बस फेर्या सुरू करण्यात आल्या आहेत.

१) सकाळी १० वाजता- चांदुर रेल्वे ते अमरावती मार्गे सावंगा (विठोबा)

२) सकाळी ११ वाजता- अमरावती ते चांदुर रेल्वे मार्गे सावंगा (विठोबा)

३) सायंकाळी ५ वाजता – चांदुर रेल्वे ते अमरावती मार्गे *सावंगा (विठोबा)

४) सायंकाळी ६ वाजता- अमरावती ते चांदुर रेल्वे मार्गे सावंगा (विठोबा) (ही फेरी पुरेसे प्रवासी उपलब्ध असल्यास सोडण्यात येईल.)

सदर फेरी चांदुर रेल्वे-मांजरखेड-चिरोडी-सावंगा (विठोबा)-लालखेड-मोगरा-भानखेड-अमरावती या मार्गे दुहेरी बससेवा राहील.तरी सर्व भाविक भक्तांनी अवैध वाहनांनी प्रवास न करता एस.टी.बसने सुरक्षित प्रवास करून सहकार्य करावे,असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील,वामण रामटेके,गोविंद राठोड,दिगांबर राठोड,अनिल बेलसरे,फुलसिंग राठोड,चरणदास कांडलकर,वैभव मानकर, स्वप्निल चौधरी विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

veer nayak

Google Ad