महिलांच्या शिक्षणाची ज्योत पेटवणारी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्यध्यापिका ,आजीवन आपल्या पतीचे कार्य आपल्या खांद्यावर वाहुन नेणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जुना धामणगाव येथे संपन्न.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रफुल्ल महल्ले सर तर प्रमुख वक्ते गौरवजी वानखडे व जुना धामणगाव येथील जेष्ठ नागरिक श्री अशोकजी तायडे उपस्थित असुन त्यांनी सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. नंतर यावेळी 10 ते 20 या वयोगटातील मुलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश टाकत सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.
शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार ,तीच सावित्रीमाई आज या जगाची शिलेदार -गौरवजी वानखडे तर स्त्री शिक्षणाचे ज्यांनी बीज रोवले,ज्यांनी सन्मानाने जगायला शिकवले त्या सावित्रीआईचे विचार समाजापर्यंत पोहचवणे गरजेचे-प्रफुलजी महल्ले
तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाषजी बोरकर यांनी केले तर आभार आशुतोष भुजबळ यांनी केले या कार्यक्रमासाठी मनीष राऊत,मंगेश बोबटे,मोहन गोपाळ,लोकेश रेवाडे,रामदासजी धुडसे,हेमंत राऊत, हेमंत तायडे,बबलू शिंदे,सुमित सहारे,मुकुंद भुजबळ, गौरव राणे,सागर भोयर,कुणाल काळसरपे,प्रशांत तायडे,ऋषिकेश चौधरी,सुरज कुटे,दीपक भोयर,तुषार राऊत,संकेत राऊत,सागर मनोज राऊत राणे,अभिषेक वेळूकर,तुषार वेळूकर,कृष्णा भोयर, मंगेश बोबाटे यांनी अथक परिश्रम घेतले