धामणगाव रेल्वे (प्रतिनिधी):
सराफ नगर, परसोड़ी रोड येथे उभारण्यात आलेल्या स्वस्तिक मॉल (फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स) चा भव्य शुभारंभ विजया दशमीच्या पावन पर्वावर गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला.
️ या मॉलमध्ये फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स व गिफ्ट आर्टिकल्सची आकर्षक व भव्य श्रंखला उपलब्ध असून, धामणगावकरांसाठी खरेदीचे नवे आधुनिक केंद्र ठरणार आहे.
शुभारंभ सोहळ्यास नगरातील मान्यवर, व्यापारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले.
आयोजक श्रीमती देवबाला प्रकाशचंदजी जैन, प्रितेश व विपुल जैन परिवार यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत करून आभार मानले.