जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर ( शिराळा )
अमरावती / वरुड : युवाशक्ती ग्रामविकास संघटनेच्या वरुड तालुका कार्यकारिणीचे गठन रविवार दि. ९/३/२०२५ रोजी स्थानिक वरुड येथे करण्यात आले.
युवाशक्ती ग्रामविकास संगठन हे संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महसूल विभाग यांच्या मार्फत होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करणारी एकमेव संघटना आहे.
युवाशक्ती ग्रामविकास संघटना ही संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असून सामान्य नागरिकांना शासकीय कामांमध्ये येणाऱ्या अडचणी, समस्या, विनाकारण त्रास, व शासकीय कामांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचार विरोधात सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरता सदैव कार्यरत असणारी महाराष्ट्रातील ही एकमेव संघटना आहे.
महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यातमध्ये संघटनेचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे.
अशातच रविवार दि. ९/३/२०२५ रोजी युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय इमरान पठाण सर, मुख्य कार्यकारीणी सदस्य रामेश्वर सुलताने सर यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख प्रमोद घाटे व उपजिल्हाप्रमुख पवन पाटणकर यांनी वरुड तालुका कार्यकारीणी गठीत करून नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांना पद नियुक्तीपत्र देऊन तालुका नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी युवाशक्ती ग्रामविकास संगठन वरुड तालुकाध्यक्षपदी पवन ठाकरे, तालुका उपाध्यक्षपदी पलाश वानखडे व अनिल सराटकर, तालुका सचिव पदी राजेश धोटे, तालुका सहसचिवपदी रीता गजानन फुलेकर, तालुका कोषाध्यक्षपदी राहील शादाब मुश्ताक शहा, सहकोशाध्यक्षपदी मकसूद सलीमखॉ पठाण, तसेच तालुका कार्यकारीणी सदस्यपदी, युगल गायकवाड, रेखा तुमराम, राहुल नेहारे, सुमित जिचकार यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी सर्व तालुका कार्यकारिणीचे युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.