घरकुल व १५ वा वित्त घोटाळ्याविरोधात युवकांचे आमरण उपोषण

0
53
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

तळेगाव दशासर (ता. धामणगाव रेल्वे) :

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी तळेगाव दशासर येथे घरकुल योजना व पंधरावा वित्त आयोग निधीतील कथित घोटाळ्यांविरोधात गावातील युवकांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी तक्रारी करूनही दोषींवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. चौकशी पूर्ण होऊन जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्धार युवकांनी व्यक्त केला आहे.

या आमरण उपोषणात पंकज मारोतराव पेटकर, संजय मंगलराव सारवे, विठ्ठल शामरावजी दुधे, जयवंत विश्वनाथजी भोयर व तुषार अशोकराव धनजोडे सहभागी झाले आहेत.

घरकुल व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या वाटपात मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून, ,जून महिन्यामध्ये माननीय आमदार प्रतापदादा अडसड यांच्या समक्ष वरुड पंचायत समितीची चौकशी समिती नेमून दोनही अहवाल आले त्यानंतर जि प जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्रा मॅडम यांच्या दालनामध्ये सुनावणी झाली त्यानंतर दोन महिने उलटून सुद्धा कुठल्याही प्रकारे कारवाया झालेल्या नाही त्याकरिता पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पासून प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू करण्यातआलेअशी मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलनामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

veer nayak

Google Ad