जुना धामणगाव हद्दीमध्ये दारू विक्रेत्यांना (बार व इतरत) गावाच्या हद्दीत नवीन परवानगी एनओसी न देता परवानगी ही ग्रामसभेच्या व गावकऱ्यांचे परवानगी शिवाय ग्रामपंचायतने देऊ नये अशी मागणी करत जुना धामणगाव येथील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्याम गंधे यांनी जुना धामणगाव येथील ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांना दिले निवेदन.
जुना धामणगाव येथील भाजपा अध्यक्ष श्री.शाम गंधे यांनी जुना धामणगाव हद्दीमध्ये अवैध्यरित्या व रीतसर दारू विक्रेत्या (बार व इतरत्र)दुकानांना एनओसी परवानगी न देता या संदर्भात ग्रामपंचायतला परवानगी मागण्यात आली असल्यास ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये या संदर्भात ठराव ठेवून गावसंमतीनेच परवानगी देण्यात यावी. याव्यतिरिक्त ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये ठराव मंजूर करून अशा पद्धतीची परवानगी देण्यात आल्यास गाव स्तरावर उपोषणाचा पर्याय आम्हा ग्रामस्थांना खुला असेल असे आम्ही गृहीत धरू आणि गावातील पूर्ण महिलांना सोबत घेऊन आम्ही या पद्धतीच उपोषण करू करिता याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा या पद्धतीने उपोषण उभारल्या गेल्यास सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे म्हणाले.