मा. श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित एस ओ एस कब्स येथे जागतिक हत्ती दिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी जागतिक हत्ती दिवस 12 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात साजरा केला जातो. प्री प्रायमरी हेड मा. शबाना खान मॅडम आणि शिक्षिका रेणुका सबाने मॅडम यांनी हत्ती या प्राण्यांविषयी माहिती सांगितली. जागतिक हत्ती दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे हत्ती या प्राण्यांविषयी जागरूकता आणि त्यांचे संरक्षण करणे हा आहे. हत्ती हा प्राणी आपल्याला कसा उपयोगी पडतो हे समजावून सांगितले काही विद्यार्थ्यांनी हत्ती या प्राण्यांचे वर्णन सांगितले. जागतिक हत्ती दिवसा विषयी हत्ती चे चित्र काढले आणि हत्ती सारखे चालून दाखविले या ॲक्टिव्हिटी घेण्यात आल्या कार्यक्रमाचा शेवट हत्तीच्या संरक्षणार्थ प्रतीज्ञा घेऊन करण्यात आला.शाळेच्या मुख्याध्यापिका प्रचिती धर्माधिकारी मॅडम आणि प्रि प्रायमरी हेड शबाना खान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमच्या यशस्वीतेकरिता प्रणिता जोशी, रेणुका सबाने, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, राणी रावेकर, प्राजक्ता दारूंडे श्रध्दा राॅय, आश्विनी नांदणे यांनी सहकार्य केले.