सांगळूदकर महाविद्यालयात जागतिक चिमणी दिवस साजरा

0
7
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दर्यापूर – श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभाग तसेच IQAC विभाग यांच्या संयुक्तं विद्यमाने प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. या अनुषंगाने विभागाने चिमणीचे घरटे बनविण्याची स्पर्धा आयोजित केलेली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षम्हणून प्रभारी प्राचार्य तथा विज्ञान शाखा प्रमुख डॉ. विजय येलकर तथा व्यासपीठावर प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रीती दिवाण, डॉ. कुणाल देशमुख व डॉ भावना गावंडे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विविध शाखेतील एकूण 42 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी सर्व तांत्रिक व पर्यावरणीय बाबी लक्षात घेऊन उत्स्फूर्तपणे सुंदर असे चिमणीचे घरटे बनविले. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक बीएससी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी रूपाली बनारसे हिने पटकाविले, द्वितीय पारितोषिक एम एस सी प्राणीशास्त्र प्रथम वर्षाची विद्यार्थिनी तेजस्विनी खंडारे हिने पटकाविले, तृतीय पारितोषिक बीएससी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी सनिका हरणे हिने पटकाविले . बीकॉम तृतीय वर्ष ची विद्यार्थिनी धनश्री अनासाने व बीएससी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी नेहा गायधने या विद्यार्थिनींनी प्रोत्साहन पर बक्षीस पटकावले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विजय येलकर यांनी चीनमध्ये झालेल्या चिमण्यांच्या कत्तली बाबत आणि पर्यावरणामध्ये त्यांचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या स्पर्धेचे परीक्षण प्रा. हिमांशू जयस्वाल व प्रा. शुभांगी सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्राणीशास्त्र विभागाचे श्री निलेश किसवे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. प्रीती दिवाण यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी तयार केलेले घरटे महाविद्यालयाच्या परिसरामध्ये विविध ठिकाणी बसविण्यात आले

veer nayak

Google Ad