अमरावती – महिला बचत गट व आर डी ग्रुप चे वतीने काँग्रस नगर येथे योग भवनात महिला जागतिक दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे व महिला तसेच लहान मूल मुली यांची वेशभूषा स्पर्धा आयोजित करून त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले ह्या कार्यक्रमाचे आयोजन श्ल्येशा वानखेडे व शिलाताई गायकवाड यांनी केले ह्या कार्यक्रमात राज्याचे भारतीय जनता पार्टी चे उपाध्यक्ष रविराज देशमुख यांनी उद्घाटन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ हसीना शहा यांनी भूषविले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ रुपेश खडसे विदर्भ अध्यक्ष लहुजी शक्ती सेना यांनी महिला ची ताकत एक झाली तर जगातली कोणती शक्ती त्यांना हरवू शकत नाही व महिलानी स्वंयमपूर्त व्हावे महिलांनावर होणाऱ्या अन्याय अत्याचार यांच्या साठी मी व माझी संघटना सदैव पाठीशी राहील असे जाहीर आवाहन केले तर रविराज देशमुख यांनी लाडक्या बहिनी मुळेच आज मोदी सरकार व फडणवीस सरकार होऊ शकली त्या मुळे महिलांचे कौतुक केले विषेश म्हनजे सौ पूनम रुपेश खडसे यांचे श्लेशा वानखेडे यांनी औक्षण करून त्यांचा सत्कार केला सोबतच ह्या कार्यक्रमात डॉ उमक , सौ कल्पना जोंधळे , बंडू भाऊ जोंधळे , लांखनवडी फिल्म चे विजय वानखेडे , बालकलाकार नाल फ्रेम पोकळे , अलका ताई सरदार , पद्माताई पुरी ,सौ मेश्राम , चरणदास इंगोले ,ऑटो चालक गजभिये ताई यांचे प्रतिभावंत महिला व समाज सेविका म्हणून गौरवण्यात आले सिप अंबायकस मध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या ऋचा खडसे यांचे सुद्धा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सांगत राष्ट्रगीताने करण्यात आली