चांदूर रेल्वे :-
महिला आर्थिक विकास महामंडळ अमरावती अंतर्गत दिशा लोका संचालित साधन केंद्र चांदुर रेल्वेे यांच्या वतीने दिनांक 24 2 2025 रोजी पंचायत समिती अतर्गत उमेद इमारतीमध्ये महिला सक्षमीकरणाबाबत गाव पातळीवर महिलांच्या विकासाकरता पुढाकार घेत असलेल्या पुरुषाचा स्त्री समानता सुधारक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सन्मान सोहळ्याच्या ह्या कार्यक्रमाला नायब तहसीलदार अनासाने ,पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे चे पी.एस.आय , रोहित कुदळे, पंचायत समिती येथील चौधरी तसेच वैभव काळमेघ तसेच दिशा सीएमआरसी च्या अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सचिव तसेच गटातील महिला व सन्मान सुधारक स्त्रिया व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीएमआरसी व्यवस्थापक मोना डुबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावित केले व सर्वांना मविम वर्धापण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महिला सक्षमीकरण करण्यासाठी गाव पातळीवर पोशक वातावरण तयार करणे, घर दोघांचे अभियान राबविणे, घरावर पती-पत्नीच्या नावाची पाटी लावणे, महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देणे या विषयावर प्रस्ताविक करण्यात आले. त्याचबरोबर रोहित कुदळे यांनी तसेच वैभव काढणे यांनी स्त्री पुरुष समानता कशाप्रकारे असायला हवी ,ह्या सर्व बाबीची सुरुवात सर्वांनी स्वतःपासून सुरुवात करली पाहिजे अशाप्रकारचे प्रतिपादन यावेळी केले. पी एस आय. रोहित कुदळे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. वसराव चव्हाण ( वाढोणा) रितेश माहुलकर (जळका ज.) व्यवस्थापक मोना डुबे तसेच सहयोगिनी सीपीआर जगताप यांनीी आपले मनोगत व्यक्त केले. स्त्री – पुरुष सुधारक सन्मान सोहळा अंतर्गत चांदुर रेल्वे तालुक्यातील एकूण 24 गावातील जोडप्याला टी-शर्ट कॅप व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती हिराताई गजभिये यांनी केले तर मोना डुबे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यश्वितेकरिता सिपिआर सहयोगिनींनी अथक परिश्रम घेतले.