चांदुर रेल्वे(ता. प्र.) प्रकाश रंगारी
बहुउद्देशीय महिला विकास संस्था व भारतीय जल फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने नुकताच जैवविविधता व महिला सक्षमीकरण या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला।
जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत पार पडलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे माजी संचालक डॉ जयंत वडतकर हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती जिल्ह्याचे जलप्रेमी ऍड राजीव अंबापुरे हे होते. प्रमुख उपस्थित मध्ये समतादूत सलीमखा पठाण, तालुका जलदुत दिनेश जगताप,साईबाबा ग्रामीण विकास संस्थेचे बंडू भाऊ आंबटकर, हर्षाली आंबटकर व संस्थेच्या कार्याध्यक्ष अंजली गवई ह्या हजर होत्या.
जैवविविधता हा विषय व्यापक असून प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग,पर्यावरण व जल इत्यादींचा त्यामध्ये समावेश होतो. असे मत जयंत वडतकर यांनी व्यक्त केले.महिला सक्षमीकरण होतांना सामाजिक रचना सुद्धा पाहणे गरजेचे असते व समाजाने महिलांना सक्षम करण्यासाठी स्वतः पुढाकार घेणे गरजेचे असते.असे विचार राजीव अंबापुरे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला तिवसा, धामणगाव, नांदगाव खंडे व चांदुर रेल्वे तालुक्यातील मोठया प्रमाणावर महिला उपस्थित होत्या.
संचालन शीतल तेलंगे तर आभार सुनंदा सोनोने यांनी मानले.