आर्वीत मोठ्या उत्साहात श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी. संताजी महाराजांची पालखी हाताने पायदळ ओढण्यास महिलांचा समावेश

0
56
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, ता. प्रतिनिधी /

आर्वी : दि. ८ डिसेंबर २०२४ रोजी सहकार मंगल कार्यालय येथे श्री संत जगनाडे महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा सदर मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुल्हाने,प्रमुख वक्ते निलेश गुल्हाने, मा. पालकमंत्री जगदीशजी गुप्ता, संजय तीरथकर (विदर्भ केसरी), मा. नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, मा. नगराध्यक्ष श्रीमती लताताई तळेकर, माजी उपाध्यक्ष अशोक जीरापुरे, जयदादा बेलखडे,
डाॅ. दिवाकर ठोंबरे, प्रकाश जयसिंगपूरे, प्रकाश गुल्हाने, जगन गाठे, रामदासजी अजमीरे, व विठ्ठल मंदिर संस्थान, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा, आर्वी संताजी वधू-वर सुचक मंडळ, (महाराष्ट्र राज्य), अखिल भारतीय तेली समाज संघटना, तसेच सर्व प्रामुख्याने उपस्थित तेली समाज बांधव यांच्या उपस्थितीत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

तसेच या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते निलेश गुल्हाने यांनी समाज प्रबोधन करून समाजाला मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाचे संचालन संगीता मेहरे तर प्रास्ताविक धनंजय वांदीले तसेच आभार प्रदर्शन मनाेज गाेडबाेले यांनी केले. तसेच सायंकाळी ५ वाजता विठ्ठल मंदिर (विठ्ठल वार्ड) येथून श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पालखी व महोत्सव शोभायात्रा काढण्यात आली या शोभा यात्रेचे विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथुन सुरुवात करून हनुमान मंदीर पाण्याची टाकी, गुरुनानक धर्मशाळा समोरुन बारूद वाल्यांची गल्ली ते श्री संत रघुनाथ महाराज मंदीर, श्री संत तुकडोजी महाराज पुतळा, लोखंडी पुल, सराफा लाईन, गांधी चौक, डॉ. ठोंबरे दवाखाना, नेताजी डॉ. सुभाषचंद्र बोस पुतळा, सहकार मंगल कार्यालया पर्यंत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच सर्व समाजबांधवांनी आपल्या घरा समोर रांगोळी काढून दिवे लावून श्री संताजी महाराजांचे प्रतिमेचे पुंजन करून स्वागत केले व महिलांनी हाताने पायदळ पालखी ओढुन सहकार्य केले तसेच शोभा रात्रेचे सहकार मंगल कार्याल येथे रात्री ९ वाजता. समारोपन झाले व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या शोभा यात्रेचे मुख्य आकर्षण नामवंत दींडी भजन मंडळ नयनरम्य झाकी सजवुन भक्तीमय संगीत असणारा डीजे सुंदर ढोल ताशांच्या गजरात आतीशबाजी करून सर्व जाती-धर्मांच्या हजाराे समाज बांधवांच्या उपस्थितीत श्री संत संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला हाेता.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज आगरकर, रवी गोडबोले, मनोज टाके, अतुल जैसिंगपुरे,अनिल गुल्हाने, पवन ढोले, अभिजीत भीवगडे, पवन पडाेळे, सचिन बिजवे, निखिल डोरले, उमेश बारबैले, विशू आगलावे जयेश गोडबोले,विनोद अजमीरे, जगदीश पडोळे, गणेश गाठे, शुभम शिरपुरे, कौस्तुभ पंचगडे, संदीप लोखंडे, कुणाल कहारे, सौरभ गुल्हाने, राजेश आगरकर यांनी अथक परिश्रम घेतले

veer nayak

Google Ad