पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्यांना लागले नगराध्यक्ष पदाचे वारे
आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाले असून. संपूर्ण महाराष्ट्रत आता स्थानिक आर्वीच्या नगरपालिकेत खुल्या प्रवर्गातील महिला नगराध्यक्ष बनणार असली तरीही काही, वेगवेगळ्या पक्षांमध्ये ओबीसी, एससी प्रवर्गातील महिलांच्या पतींनी, आपल्या पल्लींना नगराध्यक्ष बनविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे.
अनेक कार्यकर्ते सक्रिय झालेले आहे व वरिष्ठांना तिकीट मिळण्यासाठी फोनाफोनी व पक्ष्यांच्या नेत्याशी संपर्क सुरू केला असून सर्वतर राजकीय महत्वकांक्षी लोकांच्या स्वप्नात नगाराध्यक्षपदाचा मोह दाटून आल्याचे चित्र दिसत आहे.
त्यातच सर्वपक्षीय दरबारात अद्यापही काही, डॉक्टर, प्राध्यापक,गुरुजी सामाजिक कार्यकर्ते व इतर सक्रिय नामांकित कित्येक वर्षापासून पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते ही आपली दावेदारी पक्की आहे असेही समजत आहे. परंतु कोणाचा जातीचा वचक तर माझे मंत्र्या पर्यंत थेट संपर्क असल्याचे सांगत आहे. सर्वच दावेदारी करणाऱ्या महिला उमेदवारांनी जाणत्या व अजातशगू गुरुजींना साकडे घालणे सुरू केले आहे असे म्हणतात परंतु आर्वीतील सर्व समाज मतदारावर एखाद्या गुरुजींची मक्तेदारी तर नाही ना? असेही आर्वी शहरात चौका-चौकात बोलले जात आहे. व मलाच पक्षाची तिकीट भेटणार असे चर्चेत असलेले नगराध्यक्ष पदासाठी समोर आलेले नाव दरबारात लिस्टीतून बाद करून सत्ताधारी पक्षाच्या एका मोठ्या पक्षात वजनदार नेत्याच्या पत्नीचा किंवा सुनेचा नगराध्यक्ष पदासाठी तर नंबर नाही लागणार… किंवा एखाद्या गरीब शेतकऱ्यांच्या व सर्वधर्मसमभाव व्यक्तिमत्व असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या पत्नीचा तर नंबर नाही लागेल? अशी देखील आर्वी शहरात चांगलीच कुजबूज सुरू आहे…..!













