शास्त्री चौकात बनावट ग्राहक बनून सोन्याची अंगठी चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे

0
81
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे – शास्त्री चौकात बनावट ग्राहक बनून सोन्याची अंगठी चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रथम ज्वेलर्सचे मालक महेश मुरलीधर वर्मा (वय 36) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश वर्मा यांचे शास्त्री चौकातील कॉम्प्लेक्समध्ये प्रथम ज्वेलर्स नावाने सोन्याचे दुकान आहे. फिर्यादीनुसार, एका बुरखा घातलेल्या महिलेने ग्राहक असल्याचे भासवून दुकानात येऊन पुरुषांच्या अंगठ्या पाहण्याची मागणी केली. तिने एक अंगठी पसंत करून ₹500 ऍडव्हान्स दिल्याचे सांगत दुकानातून निघून गेली.

मात्र दुसऱ्या दिवशी स्टॉक तपासणीदरम्यान सोन्याची खरी अंगठी गायब असून त्याजागी बेन्टेक्सची अंगठी ट्रेमध्ये ठेवलेली आढळली. यामुळे फसवणूक व चोरी झाल्याचे लक्षात आल्याने महेश वर्मा यांनी तात्काळ दत्तापूर पोलिसात तक्रार दिली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अनोळखी महिलेविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच आसपासच्या दुकानांमध्ये चौकशी करण्यात येत आहे.

veer nayak

Google Ad