धामणगांव रेल्वे
या धगधगीच्या युगात कुणालाही वेळ नसताना माणुसकी कायम असल्याचे उदाहरण धामणगांव रेल्वे येथे पहावयास मिळाले. वेस्ट बंगाल मालदा येथील सुभाष संचो उराव वय वर्ष 45 हा मालदा वरून पुणे येथे कामासाठी रेल्वेने निघाला होता. धामणगांव रेल्वे येथे भडभड्या पुलाखाली मृत अवस्थेत सुभाष हा मिळाला. संध्याकाळी उशिरा दत्तापूर पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन चार किलोमीटर मृतदेह अंधारात बाहेर आणले व मृतकाच्या खिशातील चिठ्ठीवरून त्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली. गरीब परिस्थिती असलेल्या त्या कुटुंबा कडे येण्यासाठी पैसे नसल्या मुळे काही सेवाभावी संस्थांनी पैसे गोळा करून त्यांना धामणगांव येथे पाठवले. पत्रकार संतोष वाघमारे यांना माहिती मिळाल्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष विनोद तिरले ,उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य रंजीत पाटेकर व भोई समाजातील युवा नेता सुरज मेश्राम यांना घेऊन अंतिम संस्काराची तयारी केली. महावीर ओसवाल ट्रस्ट यांनी सुद्धा या अंतिम संस्कार साठी मदत केली. दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड, मनोज धोटे, संदीप तिरपुडे, अभिजीत जाधव यांनी मोलाची कामगिरी करत मृतदेहाचे नातेवाईक यांना घेऊन हिंदू समशान भूमी येथे मृतदेहाचे विधीनुसार पूजन करून लहुजी शक्ती सेना पदाधिकारी, दत्तापूर पोलीस व अक्षय खळतकर सोनू खान, सुरज मेश्राम यांनी स्वतः सरांन रचून मृतदेहाच्या नातेवाईकांच्या हस्ते अग्नी देऊन अंतिम संस्कार केला मृतकाच्या पत्नी व नातेवाईकांनी लहुजी शक्ती सेना पदाधिकारी ,दत्तापूर पोलीस व इतरांचे भारी अंतकरणाने आभार मानले.