चांदुर रेल्वे / मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे अनुसूचित जाती उपवर्गीकरण (अ ब क ड) लागू करावे तसेच मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वात मुंबई ते नागपूर पदयात्रेचे आयोजन सुरू केले,ता 4रोजी ही यात्रा चांदुर रेल्वे शहरात पोहोचतात मातंग समाज बांधवांनी यात्रे सहभागी चे उत्स्फूर्तपणे स्वागत करत पदयात्रेला पाठिंबा देत येथील मातंग समाजातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.
गेल्या कित्येक वर्षापासून मातंग समाज हा दुर्लक्षित राहिला आहे सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय दृष्ट्याही समास कायम दुर्लक्षित केला गेला राजकीय दृष्ट्या ही या समाजाला संधी मिळू दिली जात नाही असा हा समाज मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर आरक्षणाचे वर्गवारी झालीच पाहिजे आमचे हक्क आम्हाला मिळाले पाहिजे आणि ते फक्त आमच्या समाजाला स्वतंत्र आरक्षणाने मिळू शकते, त्यासाठी ही पदयात्रा मुंबई ते नागपूर पायी पदयात्रा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचे उद्दिष्ट आहे ही पदयात्रा सुमारे 14 जिल्ह्यातील गावागावातून आणि शहरातून जात आहे येत्या 12 डिसेंबरला हजारो लोकांसह नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडकणार असून प्रचंड जनसमुदाय राज्यातून दाखल होणार असल्याचे लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ता 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार भारत देशातील अनेक राज्यांमध्ये अनुसूचित जाती आरक्षणाची वर्गवारी करून समाजाला न्याय देण्याचे काम केले, पण महाराष्ट्र राज्यात अनुसूची जाती उपवर्गीकरण करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला प्रदान केले मात्र महाराष्ट्र राज्य त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही, या व्यतिरिक्त खालील मागण्या सुद्धा हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे त्यामध्ये,
(१) महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजावरील वाढत्या अन्य अत्याचाराला आळा बसवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अनुसूचित जाती प्रतिबंध कायदे अन्वये दाखल गुन्हे जलद गती न्यायालयात चालवून आरोपीवर कठोर कारवाई करावी,
(२) क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशी ची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी
(३) साहित्यरत्न डॉक्टर अण्णासाहेब साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा तसेच अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा साठी १००० कोटी रुपयाचे भाग भांडवल उपलब्ध करून महामंडळ तत्काळ सुरू करावे,
(३)मातंग समाजासाठी स्वतंत्र घरकुल योजनेचे उद्दिष्ट देऊन घरकुलाचे अनुदान पाच लाख रुपये करण्यात यावे,
(४) आद्यक्रांती गुरु लहुजी उस्ताद साळवे यांच्या नावाने राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार शासनाकडून जाहीर करण्यात यावा,
(५) भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी असलेल्या पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी योजनेतील ज्याच्याकडे रद्द करून अनुदान वाढवावे जिरायती जमिनी करिता 25 लाख बगाती जमिनी करिता 35 लाख एकरी देण्यात यावे,
(६) क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच् नाव महापुरुषांच्या यादी समाविष्ट करण्यात यावे, या विविध मागण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली असून नागपूर हिवाळी अधिवेशनात या मागण्याचे निवेदन यावेळी देण्यात येणार आहे.














