हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियानांतर्गत शेतकऱ्यांसाठी वेबिनारचे आयोजन

0
12
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा दोन अंतर्गत प्रकल्पातील गावांमध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,या उद्देशाने हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा एक भाग म्हणून प्रकल्पातील शेतकऱ्यांसाठी “लागवडपूर्व तंत्र : हमखास यशाचा मंत्र या विषयावर युट्युब माध्यमातून वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर वेबिनार दि.13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 ते 12.30 या वेळेत होणार आहे.

या वेबिनारमध्ये शेतीसाठी लागवडीपूर्व तयारी, हवामानानुसार तंत्रज्ञानाचा योग्य वापर,जमिनीची मशागत, बियाण्यांची निवड तसेच उत्पादन वाढीसाठी उपयुक्त मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत करण्यात येणार आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात येणार आहे.

तरी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील सर्व शेतकऱ्यांनी या वेबिनारमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी , चांदुर रेल्वे संचित ढाकरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

veer nayak

Google Ad