डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने नागपूर ते मुंबई विमानाने प्रवास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली. धम्म प्रशिक्षण अभियाना अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळे उपक्रम राबविल्या जात आहे यामध्ये प्रामुख्याने लहान मुलावर संस्कार घडावे व प्रत्येक घराघरांमध्ये धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी श्रामनेर शिबिराचे दरवर्षी आयोजन केल्या जाते तसेच गेल्या अनेक वर्षापासून हे अभियान धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात शीदोरी या नावाने अभिमानुयायांना भोजनदान देते. एक दिवशीय व्यक्तीमत्त्व व विकास अशा प्रकारचे शिबिराचे सुद्धा आयोजन केल्या जाते सोबतच यावर्षी गेल्या 68 वर्षापासून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक विहारामध्ये ग्रंथाचे वाचन केले जाते परंतु त्या ग्रंथवाचकाचा कुठेही सन्मान केल्या जात नाही किंवा गावाशिवाय कोणीही त्याला मानसन्मान देत नाही परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाने यावर्षीपासून ग्रंथवाचक सन्मान पुरस्काराचे यवतमाळ,वर्धा,नागपूर, अमरावती आदी जिल्ह्यामध्ये सन्मान सोहळा पुरस्काराचे वितरण अभियानामार्फत केल्या गेले भीमा कोरेगाव ला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी भीमा कोरेगाव ते दीक्षाभूमी मानवंदना रॅलीचे आयोजन सुद्धा अभियानामार्फत केल्या जाते.
गेल्या अनेक वर्षापासून बौद्ध बांधव चैत्यभूमी दीक्षाभूमी या ठिकाणी रेल्वेने प्रवास करतात आणि तोही मोफत प्रवास करतात परंतु बाबासाहेबांमुळे या बौद्ध समाजामध्ये जागृती आणि सन्मानाचे जिने जगण्याची दिशा बदलून दिली म्हणून त्या बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी अभियानाने विमान प्रवास करून त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी प्रवास केला आणि तेही ग्रामीण भागातील होते हे मात्र विशेष बाब आहे सर्व अभियानाचे पदाधिकारी ग्रामीण भागात काम करणारी आहे त्यामुळे एक नवी क्रांती या ठिकाणावर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असे अभियानाचे मुख्य संयोजक जगदीश शिंदे यांनी सांगितले. यावेळी खासदार वर्षाताई गायकवाड यांनी सर्व टीमचे स्वागत केले.
यामध्ये प्रामुख्याने प्रा.इंदू नारनवरे,रवींद्र कांबळे, सुनील शिंदे, नितीन टाले, पपीता मनोहरे, सुशीला दिघाडे, करुणा मुन रमा बंनसोड,स्वाती नाईक, सुधीर वानखडे मुंबई, माधुरीताई वानखडे ,पद्माकर वहिले, मनोज कोष्टी, मनोरमा वहिले,मृदुलता हेरोडे, आदींनी परिश्रम घेतले हे मात्र विशेष