वर्धा जिल्ह्यात फायर अधिकारी असून नागपूर MIDC हिंगणा फायर स्टेशन एनओसीस मुख्य अधिकारी न. प. आर्वीची सक्ती

0
360
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

खासदार अमर काळे यांच्याकडे आर्वी नगरपरिषद येथे 2 दिवसा करिता फायर अधिकारी द्या अशी व्यवसायिकांची मागणी

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : आर्वी न. प. येथे Fire Audit अधिकारी नसल्याने आर्वी नगरपरिषद येथे किमान दोन दिवसात करिता तरी आर्वी नगरपरिषद येथे फायर अधिकारी द्या अशी खासदार अमर काळे व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन समस्त व्यावसायिकांनी केली मागणी.

खासदार अमर काळे यांनी त्याच क्षणी जिल्हाधिकारी यांना दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आर्वी व्यवसायिकांची व्यथा जिल्हाधिकाऱ्या जवळ मांडुन यावर उपाययोजना करा किमान एक दिवसा करिता तरी आर्वी नगरपरिषद येथे फायर अधिकारी द्या जेणेकरून आर्वी तालुक्यातील व्यवसायिकांचा वेळ व पैशाची बचत होईल अशी रास्त मागणी केली. नगरपरिषद आर्वी येथे Fire Audit अधिकारी नसल्याने वर्धा येथे Fire अधिकारी असून सुद्धा आर्वी तालुक्यातील व्यवसायिकांना कुठलेही Fire Audit Noc घ्यायची असल्यास DFO (Nagpur), MIDC Fire Service यांचे MIDC Fire Station, Hingna येथे ना हरकत Noc करिता मुख्याधिकारी न.प. आर्वी यांच्या सूचना पत्रा नुसार पाठवत आहे. आर्वी नगरपरिषद येथ फायर अधिकारी नसल्याने आर्वी तालुक्यातील (शासकीय निमशासकीय) हॉस्पिटल, दवाखाने, शाळा, कॉलेज, मॉल, लॉज, हॉटेल, मंगल कार्यालय बऱ्याच व्यवसायिकांना अतिशय मनस्ताप होत आहे. आर्वी न.प. येथे किमान आठवड्यातून दोन दिवसांकरिता तरी Fire Audit अधिकारी नेमण्यात यावा अशी सर्व व्यावसायिकांनी मागणी केली आहे. तसेच निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते पंकज गोडबोले व व्यवसायिक करण मोटवानी, मिलिंद गुल्हाने, सुधीर शेंडे, हातिम भाई बोहरा, टेकचंद मोटवानी, अनिल लांडगे, लीलाधर खनके, अज्जू मोटवानी, अभिनव पंचगडे, मंगेश लाडके, पालीवाल, सुमित शिंगाने व इतर व्यवसायीक प्रामुख्याने उपस्थित होते.

veer nayak

Google Ad