वर्धा- अमरावती दोन जिल्ह्याच्या मध्यंतर पुलाची वाढणार उंची केंद्रीय मंत्री .नितिन गडकरी यांची घेतली आ प्रताप अडसड यांनी भेट

0
13
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे

वर्धा- अमरावती दोन जिल्ह्याच्या मध्यंतर पुलगाव -विटाळा या वर्धा नदीच्या पुलाची उंची वाढविण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल उचलले असून या संदर्भात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची आ प्रताप अडसड यांनी भेट घेतली आहे

दोन जिल्ह्याच्या मध्यंतरी अनेक वर्षापासून पुलगाव विटाळा या गावाजवळ वर्धा नदीवर हा कमी उंचीचा पूल आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील वकनाथ, विटाळा, बोरगाव धांदे ,चिंचोली झाडगावं, झाडा ,गिरोली , सोनेगाव खर्डा या गावांची बाजारपेठ पुलगाव असल्याने या पुलावरून ग्रामस्थांना ये -जा करावी लागते सदर पुलाची अवस्था बिकट असल्याने येथून मोठी वाहतूक बंद करण्यात आली तर दुचाकी वाहने पावसाळ्यात बंद करण्यात येते नुकतेच या पुलावरून एक जोडपे आपल्या दुचाकी चे नियंत्रण सुटल्याने पुरात वाहून गेले या बाबीची आमदार प्रताप अडसड यांनी गंभीर दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

विटाळा व पुलगाव ला जोडणारा वर्धा नदीवरील बंद असलेला व खचलेला पूल नव्याने बांधकाम करण्याकरिता सीआरएफ मधून निधी देण्याची मागणी आ. अडसड यांनी केली सदर पुलासाठी आगामी काळात निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार प्रताप अडसड यांना दिले

veer nayak

Google Ad