सांगळूदकर महाविद्यालयात रासेयो तर्फे मतदान जनजागृती सप्ताह साजरा.

0
47
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय दर्यापूर येथे प्राचार्य डॉ अतुल बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे “नवमतदार जनजागृती अभियान” सप्ताह दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ ते ०६ मार्च २०२४ राबविण्यात आला. दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी रासेयो पथकाद्वारे मतदान करण्याचे महत्त्व सांगणारे पथनाट्य सादर करण्यात आले तसेच दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकां द्वारे रॅलीचे आयोजन करण्यात आले.

दिनांक ०१ मार्च २०२४ रोजी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मतदान जागृती याबद्दलची शपथ देण्यात आली व दिनांक ०२ मार्च रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी आपल्या मार्गदर्शनातून ‘विद्यार्थ्यांना योग्य मतदानाचे फायदे व मतदान का करावे ‘ याबद्दल संबोधन केले. 

दिनांक ०४ मार्च रोजी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश पानतावणे यांनी विद्यार्थ्यांना मतदान कसे करावे व मतदानाचे नियम याबद्दल त्यांच्या व्याख्यानातून माहिती दिली. दिनांक ०५ आणि ०६ रोजी महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या मी जागृत मतदार या सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांनी आपले सेल्फी काढून स्वतःची मतदानाबद्दल जागरूकता दर्शवली.

या सर्व कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राहूल सावरकर , महिला कार्यक्रम अधिकारी वैशाली चौरपगार, सहा. कार्यक्रम अधिकारी डॉ. सुशील चरपे, महिला सहा. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रिती दिवाण यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. वरील सदर सर्व कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे योगदान लाभले.

veer nayak

Google Ad