स्थानिक अमरावती . येथील निवृत्तअप्पर जिल्हाधिकारी श्री स्वर्गीय मुकुंदराव कोंडे यांच्या निधनानंतर त्यांचे नेत्रदान करण्यात आले वंदनीय तुकडोजी महाराज कर्मवीर गाडगे महाराज व उपाध्य भाऊसाहेब देशमुख यांच्या विचाराने भारावलेले स्वर्गीय मुकुंदराव कोंडे यांनी आपल्या जीवनामध्ये समाजपयोगी कार्य करून समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला .त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक वृद्धाश्रमांना, अनाथ आश्रमांना ,मंदिरांना, देणगी दिली, सोबत सामाजिक कार्य सुद्धा केले आणि म्हणून त्यांच्या पश्चात त्यांची मुलं डॉक्टर नितीन कोंडे व श्री विवेक कोंडे यांनी त्यांच्या शुद्ध पंगत या दिवशी राष्ट्रसंतांचे साहित्य आलेल्या सर्व पाहुण्यांना वाटप केले तसेच ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे धामणगाव रेल्वे यांच्या हस्ते ग्रामगीतेतीलतील मृत्यू संस्कार अध्यायाचे वाचन करून सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला .
आलेल्या सर्व पाहुण्यांनी राष्ट्रसंतांचे साहित्य आवडीने आपल्याजवळ ठेवून घेतले. राष्ट्रसंतांनी आपल्या आर्त संदेश यामध्ये सांगितले होते की जे कोणी असतील माझे जनी सकळ त्यांनी ग्रंथ करावा ग्रंथाचा सुकाळ या ओळीप्रमाणे आज या कार्यक्रमातून प्रचाराचे महत्त्वाचे कार्य कोंडे परिवाराने केलेले आहे. म्हणून स्वर्गीय मुकुंदराव कोंडे यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो हीच प्रार्थना शेवटी राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.