विश्व हिंदू परिषद बजरंग दल धामणगाव रेल्वे प्रखंड मधिल तळेगाव दशासर येथे विश्व हिन्दू परिषद स्थापना दिवस संपन्न रामजी लोखंडे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित.

0
2
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

स्थानिक तळेगाव दशासर येथे नुकतेच श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि विश्व हिंदू परिषद चा स्थापना दिवस संपन्न झाला. सन 1964 मुंबईच्या संदिपाने आश्रमात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली तेव्हापासून आजपर्यंत समस्त हिंदू समाजाच्या सहकार्य व साधुसंताच्या आशीर्वादाने विश्व हिंदू परिषद संपूर्ण विश्वाच्या हिंदूंचे एकत्रीकरण व त्यांच्या हितासाठी कार्य करीत आहे यावर्षी विश्व हिंदू परिषद आपल्या स्थापनेला 61 वर्ष पूर्ण करीत आहे त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

व तसेच महाप्रसाद आयोजन होते , सदर कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून रामजी लोखंडे विदर्भ प्रांत सेवा प्रमुख वि.हि.प., तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष पोमेश र. थोरात (संचालक:- ग्लोबलटेक कॉम्पुटर इन्स्टिट्यूट) तळेगाव द. प्रमुख उपस्थिती म्हणून रूपेश जी राऊत जिल्हा मंत्री वि.हि.प., रुपाली ताई नाकाडे जिल्हा सहसंयोजीकां मातृशक्ती , मंगेशजी मिर्झापूर जिल्हा सेवा प्र., भावरावजी बागाडे गुरुदेव सेवा मंडळ ( तळेगाव द.)मंचावरती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलांत श्रीकृष्ण , भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर विशाल तीरमारे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. त्यानंतर रामजी लोखंडे यांनी आपले मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची समारोप आरती ,जय घोषणाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जी काळे यांनी केले. कार्यक्रमाचा यशस्वी ते करता , शुभमजी गुप्ता प्रखंड अध्यक्ष वि.हि.प., विशाल तिरमारे प्रखंड मंत्री वि.ही.प. , निखिल तोंडरे धर्मचार्य संपर्क प्र.वि.हि.प. , तळेगाव दशासर शाखा मधिल, विशु श्रीवास , श्रेयस सालोदकर , दर्शन सुने, हर्षल जोशी, सचिन भोयर , नितीन वाघाडे, विशाल बाबरे , प्रणय पेटकर,कौशल लोया ,अभय शेंडे यांनी अथक परिश्रम केले.

veer nayak

Google Ad