विजेच्या प्रवाहित तारा पडल्याने गायींचा मृत्यू. संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम यांची घटनास्थळावर धाव

0
71
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनीधी/अमरावती

भातकुली तालुक्यातील हरताळा गावालगत असलेल्या शेतातून जाताना वीज वितरण कंपनीच्या उच्च दाब वाहिनीच्या प्रवाहित तारा पडल्याने तब्बल ८ गायींचा मृत्यू झाला. ही घटना आज गुरूवार रोजी घडली. संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. हरताळा येथून शेतातून कृषी पंपाच्या पुरवठ्याकरिता व विवीध शेतीउपयोगी कामाकरीता वीज वितरण कंपनीची उच्च दाब वाहिनी गेली आहे.. या वाहिनीच्या जिवंत विद्युत तारा दिपक सनके,विजय देशमुख, दिलीप दुर्गे,गजानन राऊत, राजू उघडे, ज्ञानेश्वर चाहकर, जगनराव चुनगुडे, यांच्या मालकीच्या तब्बल ८ गाईवर पडल्याने म्हशींचा जागीच मृत्यू झाला.

यात या शेतकऱ्यांचे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना वीज वितरण कंपनीने आर्थिक नुकसानभरपाई देण्याची मागणी संकल्प शेतकरी संघटनेचे अक्षय नितीन कदम यांनी केली आहे.आठ जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. तर दुसरीकडे महावितरणचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला. दरम्यान, वीज वितरणकंपनीच्या नियमानुसार आर्थिक नुकसानभरपाई दिली जाईल.

याकरिता पशुवैद्यकीय अधिकारी, विद्युत विभाग व भातकुली पोलिस विभागाला कळविण्यात – आल्याचे नितीन कदम यांनी सांगितले. सदर घटनेसाठी जबाबदार असनाऱ्यावर लवकर कठोर कारवाही करण्याची मांगणी करण्यात आली. या प्रकरणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय योग्य मोबदला मिळावा अशीही मागणी नितीन कदम यांनी केली.

यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम, रोशन सनके,मोहन भातकुलकर,स्वप्नील मालधुरे,सतीश सनके,मिलिंद बांबल,रवींद्र नांदुरकर,किशोर देशमुख,सुभाष राऊत,गुरुदास दुर्गे,संगम उगळे,शरद दुर्गे,शिवाभाऊ देशमुख,प्रदीपसिंग ठाकूर,अश्र्विन दुर्गे,सचिन वानखडे व समस्त गावकरी उपस्तित होते

veer nayak

Google Ad