धा.रेल्वे. ता.प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांपासून धामणगाव रेल्वे परिसरातील हवेची झुळूक आली की अनेक ठिकाणी विज पुरवठा खंडित होतो. व त्याचा त्रास शहरासह ग्रामीण भागातील जनतेला होतो.
ऐन उन्हाळ्यात उन्हाचा त्रास व दुसऱ्यी कडे विज वितरण कंपनी आठ आठ तास वीज गुल करत आहे.
वारंवार होणाऱ्या विजेच्या लपंडाव होत असल्याने.संगणक व ईतर घरगुती उपकरणांवर तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महावितरण कंपनी च्या भोंगळ कारभारामुळे धामणगाव रेल्वे व परिसरातील जनता त्रस्त आहे. या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हा संघटक प्रशांत मुन यांच्या नेतृत्वात मा.शाखा अभियंता कानडे साहेब यांच्या शी चर्चा करून. शहरातील विज पुरवठा व्यवस्थित करावा. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तिव्र आंदोलन करेल. या वेळी रवि उर्फ दादू मेश्राम ता.संघटक.प्रेम मोटघरे ता.सचिव.संदिप रामटेके. कोहिनूर श्रीरामे.दिनेश बोबडे.मनिष शेलारे.सेन्हल वानखेडे.राजेन्द्र भरोसे कार्यकर्ते उपस्थित होते