वीर नायक ठळक बातमी

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

संत रविदास महाराजांना अभिवादन

अमरावती, दि. 12 :- संत रविदास महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी अभिवादन केले.

यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी विजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा खनिकर्म अधिकारी इब्राहीम शेख, अधिक्षक निलेश खटके यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्पार्पण करुन संत रविदास महाराज यांना अभिवादन केले.

दहावी, बारावीच्या परिक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू

अमरावती, दि. 12 दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरळीत पार पाडाव्यात आणि परिक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहितेचे कलम 163 लागू करण्यात आले आहे. त्यानुसार परिक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहे.

बारावीची परिक्षा दि. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 आणि दहावीची परिक्षा दि. 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान होणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच परीक्षा परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे.

सर्व परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सदर कालावधीत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात व्यक्तींच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके बंद ठेवण्यात येणार आहेत.

सदर आदेश जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रास लागू करण्यात आले असून दि. 18 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील. यासाठी विद्यार्थ्यांसह पालक, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी केले आहे.

veer nayak

Google Ad