श्री दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन. १३ ला पालखी भ्रमण व १४ ला महाप्रसाद…

0
2
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे, येथील अमर शहीद भगतसिंह चौक येथील पुरातन दत्त मंदिर येथे दत्त जयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी प्रमाणे या वर्षी याही वर्षी सुद्धा श्री दत्त जयंती उत्सव समिति द्वारे आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमासह उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. मंदिराद्वारे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असूनश्री गुरु चरीत्र महापारायण दिनांक ८ डिसेंबर २४ रविवार ते १४ डिसेंबर २४ शनिवार पर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे दिनांक १३ डिसेंबर ला दुपारी ४ वाजता श्री दत्त मंदिर येथून पालखीचे भ्रमण होणार आहे. १४ डिसेंबर शनिवारला श्री दत्त जन्म उत्सव व महाआरती दुपारी १२.३९ वाजता तसेच सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी भक्तांनी दत्त जयंती निमित्ताने आयोजित सर्व धार्मिक कार्यक्रमांचे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त जयंती उत्सव समिती अमर शहीद भगतसिंह चौक धामणगाव रेल्वे च्या वतीने करण्यात आले आहे.

veer nayak

Google Ad