धामणगाव एज्युकेशन द्वारा संचालित श्रीमती हिराबाई गोयंका कन्या विद्यालय मध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्त एक ते पंधरा नोव्हेंबर जनजाती गौरव पंधरवडा निमित्त शाळे च्या मुख्याध्यापिका सौ सुनीता गो. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रभात व माध्यमिक विभागांमध्ये वर्ग 5 व 8 च्या विद्यार्थिनींनी आदिवासी वेशभूषा सादर केल्या. दिनांक 12. नोव्हेंबर 2025 ला आदिवासी लोकगीत व नृत्य सादर करण्यात आले.

वर्ग 5 च्या विद्यार्थिनी रिद्धी कुकडे ,सिद्धी कुकडे, स्वरा नेरकर ,जागृती खरजे, परिधी बावरे ,सहभागी झाल्या होत्या. माध्यमिक विभागामध्ये वर्ग आठ च्या विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य सादर केली त्यामध्ये गार्गी परचाके, राखी जाधव, दिव्यांनी राऊत, दिव्या मारखडे,गुंजन गेडाम ,चंचल महानोर सोनाली खंडाते ,या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. दिनांक 13 .11 .2025 ला प्रभात विभाग व माध्यमिक विभागात इयत्ता सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी जीवनावर कलामूल्य,परंपरा, वेशभूषा, खाद्य, संस्कृती, अधिवास ,यावर कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये स्वरा गोडबोले ,आराध्या गोडबोले ,कल्याणी करपाते ,माही अवताडे, निधी कचवे, पूर्वा वानखडे या विद्यार्थिनींनी सहभागी झाल्या होत्या. दिनांक 14. 11. 2025 ला वर्ग 7 च्या विद्यार्थिनी चित्र व पोस्टर स्पर्धा व वर्ग 10 च्या विद्यार्थिनींची निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. निबंध स्पर्धेचा विषय भगवान बिरसा मुंडा चरित्र आदिवासी कला व परंपरा जतन व संवर्धन हा होता या स्पर्धेला बहुसंख्येने विद्यार्थिनीं सहभागी झाल्या होत्या. दिनांक 15.11 .2025 ला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.देशपांडे व शाळेचे उप मुख्याध्यापक श्रीयुत राठोड यांच्या हस्ते माता सरस्वती व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सौ देशपांडे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या विविध स्पर्धा उपक्रम राबविताना जनजाती गौरव पंधरवाडा अंतर्गत बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जन्मशताब्दी निमित्त जनजाती गौरव पंधरवाडा अंतर्गत वरील कार्यक्रम स्पर्धा यांचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ देशपांडे व उपमुख्याध्यापक श्री राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव प्रमुख सौ श्रीवास, कुमारी कचवे, कुमारी चन्ने,श्रीयुत अरबट, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता सहकार्य केले.












