धामणगाव रेल्वे,
चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ नवा विश्वास.
नव्या वर्षाची हिच तर खरी सुरुवात…याचा प्रत्यय मंगळवारला आला. निमित्त होते वंदे मातरम् ग्रुपने आयोजित केलेल्या पाडवा पहाटचे…दरम्यान पाडवा पहाटने कार्यक्रमाने धामणगावची सकाळ उजळली.पाडव्याची पहाट एका खास मंजुळ स्वरांनी रंगली. कार्यक्रमाला महिला आणि पुरुषांची उल्लेखनीय उपस्थिती होती
चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा हा आपल्या भारतीयांचा नववर्ष दिवस.या नविन वर्षाचे स्वागत, सडा, रांगोळी, गुढ्या, तोरणे, मंगल वाद्य वादन या पारंपरिक पद्धतीने तर आपण करतोच,पण उगवत्या सूर्याच्या साक्षीने, सूर व स्वरांना सोबत घेऊन नववर्षाचे सामुहिक स्वागत करण्यासाठी.
येथील वंदे मातरम ग्रुपतर्फे गुढी पाडवा निमित्त येथील नगर परिषद भिखराज गोयनका शाळेच्या प्रांगणात पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारला पहाटे ५.३० वाजता करण्यात आले होते.मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडवाच्या पर्वावर गीते सादर करुन नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.यानिमित्ताने पहाटेला सुरेल मंजुळ स्वरांची मेजवानी इंडियल आयडल, सारेगमा फेम मुंबई येथील जगदीश चव्हाण,नागपूर येथील तेजस्विनी खोडतकर व आदींनी दिली.तसेच संगीताची साथ नागपूर येथील तबला वादक डॉ.देवेंद्र यादव,अमरावती येथील बासरी वादक जानराव देहाडे,नागपूर येथील सौरभ किल्लेदार,अमरावती येथील नकुल मोरे यांनी उपस्थितांची मने जिंकली.यावेळी कार्यक्रमाचे निवेदन सागर ठाकरे यांनी सादर केले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून इंडियन मेडिकल असोशिएशन
धामणगावचे सचिव डॉ,राजेश वाटाणे,डॉ.दिपाली वाटाणे व आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
संचालन, प्रास्ताविक व आभार समूहचे सचिव उमेश गोंडीक यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंदे मातरम् ग्रुपचे अध्यक्ष दिनेश बोबडे,उपाध्यक्ष सुनील शिंदे,रमेश बेहरे,सचिव उमेश गोंडिक,सहसचिव कमल छांगाणी,कोषाध्यक्ष अंकुश चौधरी,माजी अध्यक्ष नरेंद्र चौधरी,मिलिंद तिनखेडे ,मोहमद शरीफ,सुनील दारोकार,प्रताप अडसड ,प्रवीण कुचेरीया ,अशोक बुधलानी,धनंजय पदवाड ,शकील अहमद,दिपक धुमाळ,जगदीश जाधव, जयेश वंकानी,प्रदीप पोळ, सागर ठाकरे,प्रशांत बदनोरे,सुनील साळुंखे यांनी प्रयत्न केले.
—–
मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं.यानिमित्ताने येथील वंदे मातरम् ग्रुपतर्फे पाडवा पहाट हा उपक्रम कौतुकास्पद व दखलपात्र आहे.
डॉ.राजेश वाटाणे,
सचिव,इंडियन मेडिकल असोशिएशन धामणगाव रेल्वे