राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती जि. ब्रि. अध्यक्षा सुनीता जाने यांच्या निवासस्थानी उत्साहात साजरी

0
31
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : दि. १२ जानेवारी २०२६ ला राजमाता जिजाऊ‌ यांच्या जयंती निमित्य जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सुनीता जाने यांच्या निवासस्थानी जिजाऊंच्या कार्याला उजाळा व अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली.

जिजाऊ ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमामधे जिजाऊंच्या आदर्श विचारावर प्रकाश टाकण्यात आला.

तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष डाॅ. कालिंदी राणे यांनी केले. तर जिजाऊ ब्रिगेडच्या सचिव मायाताई चौधरी यांनी जिजाऊंच्या कार्याची माहीती दिली. अँड. अलका काळे उपाध्यक्ष यांनी अभिवादनास्पर भाषण केले. जिजाऊ ब्रिग्रेच्या अध्यक्षा सुनिता जाने यांनी जिजाऊने शिवबाला कसे घडविले हे आपल्या भाषणातून सांगितले. तसेच कार्यक्रमाचे पाहूने अँड. सुरेन्द्र जाणे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जिवन कार्यावर माहीती दिली. मराठा सेवा संघाचे चौधरी सर, विलास हुड, ठाकरे सर, विजय मारोटकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल आपल्या भाषणातून माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण प्रा. विजया मुळे यांनी केले. तर पंकज गोडबोले यांनी आभार मानले.

डॉ. कालींदी राणे, अँड. उज्वला चौधरी, अँड. अल्का काळे, मायाताई चौधरी, अँड. ज्याेती ठाकरे, माया हुङ, कार्यक्रमाला यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिजाऊ ब्रिगेडच्या काेषाध्यक्ष अँड. उज्वला चौधरी तसेच जि. ब्रि. उपाध्यक्ष जोत्सना चकोर, मायाताई हुड, अँड. ठाकरे, मृदुल जाने यांनी मदत केली.

veer nayak

Google Ad