श्रीमती हरीबाई भागचंदजी प्राथमिक विद्यालय धामणगाव रेल्वे यांच्यातर्फे आधुनिक व्यवहारांमध्ये आर्थिक साधनांचा वापर या विषयावर कार्यशाळा संपन्न

0
35
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

कार्यशाळेमध्ये एसबीआय धामणगाव रेल्वे शाखेच्या सी एस पी सेंटरचे संचालक फरहान खान यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

धामणगाव रेल्वे – प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना बचतीची संकल्पना स्पष्ट व्हावी आणि आपल्या भावी आयुष्यामध्ये बचत केलेल्या पैशातून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी काहीतरी लाभ व्हावा या उद्देशाने श्रीमती हरीबाई भागचंदजी प्राथमिक विद्यालय धामणगाव रेल्वे यांच्यातर्फे आधुनिक व्यवहारांमध्ये आर्थिक साधनांचा वापर या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेमध्ये एसबीआय धामणगाव रेल्वे शाखेच्या सी एस पी सेंटरचे संचालक फरहान खान यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सी एस पी सेंटरचे संचालक फरहान खान यांनी विद्यार्थ्यांना बचतीचे महत्त्व, बँकेमध्ये खाते कसे उघडायचे, खाते उघडल्यानंतर त्यामध्ये पैसे कसे भरायचे आणि काढायचे याबद्दल मार्गदर्शन केले. बँकेचे व्यवहार करताना त्यामध्ये मोबाईल ॲप्स जसे गुगल पे ,फोन पे, यूपीआय ट्रांजेक्शन कसे करायचे याबद्दल अतिशय मोलाची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी सी एस पी सेंटरचे संचालक फरहान खान यांनी दिली. या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.चंदा चौधरी मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी प्रयत्न केले..

veer nayak

Google Ad