शहरी आरोग्य केंद्र पठाण चौक अंतर्गत जमील कॉलनी चौक येथे डॉ. निगार खान, श्री वैद्यकीय अधिकारी पठाणचौक यांच्या मार्गदर्शनाखाली डेंगू मलेरिया व इतर कीटकजन्य आजारांविषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी तसेच प्रमुख अतिथी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.फिरोज खान, शहर क्षयरोग अधिकारी मनपा अमरावती, डॉ. रुपेश खडसे, साथरोग अधिकारी, मनपा अमरावती, डॉ. जुनेद, जिल्हा हिवताप कार्यालय, डॉ.अस्मिता मुंद्रे, वैद्यकीय अधिकारी, डॉ. अश्विनी भिलावेकर, वैद्यकीय अधिकारी, डॉ. अस्मा रफीक खान तसेच डॉ. सौद अन्सारी, संचालक बर्थ हॉस्पिटल, डॉ. सैय्यद जाकीर, संचालक हमदम हॉस्पिटल, डॉक्टर रजिया खान व डॉ. अब्रार खान संचालक ओवीसी हॉस्पिटल, डॉ. परवेज खान, ऑरेंज सिटी हॉस्पिटल यांचे डॉ. निगार खान यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. विशाल काळे यांनी स्थानिक नागरिकांना डेंगू व मलेरिया या विषयावर मार्गदर्शन केले तसेच डॉ.शरद जोगी यांनी मार्गदर्शन करताना डेंगू मलेरिया या नुक्कड नाटकाची प्रशंसा करून स्थानिक नागरिकांना डेंगू मलेरिया या आजाराचे निर्मूलन करायचे असेल तर आपल्याला सर्वांना आपले कुटुंब आपली जबाबदारी याचे महत्त्व पटवून सांगितले.
डॉ. रुपेश खडसे यांनी स्वच्छतेवर भर देऊन नागरिकांना डेंगू मलेरिया व चिकनगुनिया या आजारांना दूर करण्याचे आव्हान केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून कर्मचाऱ्यांना तसेच नागरिकांना डेंगू मलेरिया या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला परिसर व आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच दूषित कंटेनर खाली करण्यावर भर दिला. गायत्री नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी नुक्कड लघु पटनाटकातून डेंगू मलेरिया व इतर कीटकजन्य आजाराचे लक्षण, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी जनजागृती केली तसेच या नाटकाचे कौतुक सुद्धा करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनी जनजागृती रॅलीला हिरवी झंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. जन जन का यही हो नारा, डेंगू मलेरिया मुक्त हो एरिया हमारा. हे घोषवाक्य देऊन रॅलीची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हैदर अली, आरोग्य निरीक्षक यांनी केले तर या कार्यक्रमांतर्गत डेंगू मलेरिया या आजाराची निर्मूलन करण्यासाठी शपथ तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिपंकर बरडे आरोग्य सेवक यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री प्रशांत ढोके यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला गायत्री नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी लघुपटनाटक सादर करून या कार्यक्रमाला एक नवी दिशा दिली. डेंगू मलेरिया जनजागृती कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शहरी आरोग्य केंद्र पठाण चौक येथील सर्व कर्मचारी तसेच आशाताई यांनी सहयोग केला. तसेच शहरी आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी केंद्राचे सर्व आरोग्य सेवक यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून नागरिकांपर्यंत डेंगू मलेरिया या आजारांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला.