शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी व महिला आरोग्य समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवसाला सौम्या शर्मा(चांडक) यांनी केला योग 

0
4
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती – संपूर्ण जगात 21 जून हा योग दिन साजरा करण्यात येतो अमरावती शहरातील कर्तव्य सेलिब्रेशन लॉन येथे शेकडो लोकांनी योग कार्यक्रमात येऊन प्रशिक्षक यास्मिन निखत व प्रियंका गोवारे यांनी सकाळी 6 ते 7 वेळेस सर्वांना योग शिकवले ह्या योग वेळेस मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी योग केला व सर्वांनी वेळेतून वेळ काढून कमीत कमी एक तास स्वतःच्या शरीराला दयावा जेणेकरून शरीराला औषधाची गरज पडणार नाही

शरीर तंदुरुस्त राहील असे मार्गदर्शन केले व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी सुद्धा योग करून योगाचे महत्व सांगितले तसेच कार्यक्रमाला आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे मनपा यांनी योग केल्यांनी होणारे फायदे सांगून नवनियुक्त आयुक्त यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले

,वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप पाटबागे , डॉ मनोज मुंधडा वैद्यकीय अधिकारी ,मंजुषा महल्ले,स्वाती जावरे,प्रवीण आठवले , निलिमा बुध डॉ फिरोज खान , आरोग्य सेवक , आरोग्य सेविका उपस्थित राहून योग करून सर्व शहरी आरोग्य केंद्र या वतीने संपूर्ण शहरात जनजागृती करून योग करण्यासाठी जनतेला जाहीर आवाहन करण्यात आले आहे

veer nayak

Google Ad