श्री विठोबा संस्थान च्या विश्वस्त पदी लक्ष्मण राठोड यांची निर्विरोध नियुक्ती

0
6
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे (ता. प्र.) प्रकाश रंगारी

चांदुर रेल्वे :- संपूर्ण महाराष्ट्रात कापुराची यात्रा म्हणुन ख्याती असलेले महाराष्ट्रातच नव्हे तर राज्याबाहेरील ही भाविक गुढीपाडव्याच्या पर्वावर लाखों च्या संख्येने उपस्थिती दर्शवितात असे चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक १९/१२/२०२४ गुरुवारला दुपारी १२.०० वाजता संस्थानची सामान्य सभा संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे यांचे अध्यक्षेते खाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी संस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त दिगांबर राठोड यांच्या राजीनाम्यामुळे विश्वस्त पद रिक्त झाले होते. त्यामुळे अवधूती सांप्रदायातील ख्यातनाम असे युवा व्यक्तिमत्व लक्ष्मण राठोड यांची संस्थानच्या समस्त पदाधिकारी व विश्वस्त यांच्या वतीने निर्विरोध नियुक्ती करण्यात आली.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील,वामन रामटेके,गोविंद राठोड,अनिल बेलसरे,फुलसिंग राठोड,चरणदास कांडलकर,वैभव मानकर, स्वप्निल चौधरी उपस्थित होते.

veer nayak

Google Ad