26 जानेवारी 1950 रोजी या देशात कायद्याचं म्हणजे प्रजेचं राज्य आलं म्हणून या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून संबोधतो या दिवशी या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेची अंमलबजावणी झाली आणि कायद्याचं राज्य आलं परंतु मोदी सरकारच्या काळात संविधानच धोक्यात आले.
अशी भावना जनमानसात झाली हे संविधान टिकलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि या देशात कायद्याचं राज्य राहायला पाहिजे यासाठी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुका व शहर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारत मातेचे व संविधानाचे पूजन जिल्हाप्रमुख यांचा कडून करण्यात आले त्या प्रसंगी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बद्दल काढलेले अनूडगर याचे निषेध करण्यात आले. धामणगाव रेल्वे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) तालुका प्रमुख निलेश मुंदाने, शहर प्रमुख नरेंद्र देऊळकर, संतोष गावंडे, रवी काटणकर, विनोद शलोकर, शाम भेंडारकर, दिनेश दाभाडे, अनिल माळोदे, सुरेश जुनघरे, बबलू गोपाळ, आशिष गावंडे, प्रतीक धोमने, प्रशांत शिंदे, सचिन पावडे, दीपक शेंद्रे, नंदुभाऊ डुकरे, युवासेना मा. उपजिल्हाप्रमुख अमोल पवार, आदी उपस्थित होते