धामणगाव रेल्वे :- शेतकरी, शेतमजुर, अंगणवाडी सेविका,डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या हिताच्या भंकस गोष्टी करून व शेतकऱ्याची क्रूर थट्टा करून तसेच धर्मा-धर्मा मध्ये व जाती-पाती मध्ये भांडणे लावणाऱ्या केंद्र व राज्य शासनाला जागे करण्यासाठी माजी आमदार प्रा. विरेन्द्र जगताप यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून धामणगांव रेल्वे तहसिल कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन सोमवारला (ता.२३) काढण्यात आला.
या धडक मोर्च्यात भा.क.प.चे जिल्हा सहसचिव सुनिल घटाळे व आदी उपस्थित होते. सदर मोर्च्याच्या निमित्ताने पुढील मागण्या करण्यात आल्या. २०२३-२०२४ या वर्षामध्ये ई-पिक पाहणी ची अट रद्द करावी, सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी रु. ५००० ची तात्काळ मदत द्यावी.पावसाअभावी तडण गेल्यामुळे सोयाबीनचे हिरवे पिक करपले त्याचे पंचनामे करून हेक्टरी दहा हजार रुपये मदत तात्काळ द्यावी.हवामान बदलामुळे व उष्णतेमुळे संत्रा पिकांचे अतोनात नुकसान झाले असून संत्रा गळ मोठ्या प्रमाणावर झाली असून संत्रा शेतक-यांना तात्काळ पंचनामे करुन हेक्टरी १० हजार रुपये मदत द्यावी. सतत च्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पिक वाढ न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये घट झाली त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई हेक्टरी २५ हजार रुपये देण्यात यावी. ग्रामिण व शहरी भेद न करता ३ लक्ष रुपये घरकुलसाठी द्यावे.४ महिन्यापासून घरकुल योजनेचा निधी उपलब्ध नसल्यामुळे घरकुल लाभार्थी निधी पासून वंचीत आहेत, तात्काळ निधी उपलब्ध करुन द्यावा. सोयाबीन पिकाला किमान ७ हजार रुपये व कापसाला रु. १० हजार रुपये भाव मिळावा. मागील सरकार मध्ये विरोधी पक्षात असतांना फडणविस यांनी मागणी केली होती, मागणी पूर्ण करावी.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी.अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत राशन द्या.अंगणवाडी सेविका / मदतनिस, आशावर्कर / सुपरवाइझर, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या प्रलंबीत मागण्या तातडीने पूर्ण कराव्या.सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती ५० टक्के गुणवत्ता शिष्यवृत्ती, अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, भारत सरकार प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गिय शिष्यवृत्ती (मुलींकरीता) निधी तात्काळ द्यावा. तुषार सिंचन, ड्रिप एरीगेशन पूर्व संमती देणे बंद असून तात्काळ पूर्व संमती देण्यात यावी, वर्षभरापासून चे अनुदान उपलब्द नसल्यामुळे अनुदान तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावे. घरगूती विज बिलामध्ये भरमसाठ वाढ झाली असून घरगूती विज अधिभार,युनीट यामध्ये कमी करावी. स्मार्ट मिटर योजना तात्काळ बंद करावी. आपल्या न्याय मागण्यासाठी तालुका काँग्रेस कमेटीचे पंकज वानखडे,शहर काँग्रेस कमेटीचे प्रदीप मुंधडा,जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे ,चंदू डहाणे ,कैलास ठाकरे, नितीन कनोजिया, श्रीकृष्ण सडमाके,धम्मा खडसे, विश्वनाथ कांबळे ,सुरेश निमकर, नितीन दगडकर ,अनिता मेश्राम, कविता गावंडे, मंजुषा राठी, सविता इंगळे ,श्रीमती शेळके, मंगेश बोबडे, रवी भुतडा ,मोहन पाटील घुसडीकर ,सुनील भोगे, यशवंत बोरकर, प्रशांत हुडे, दिलीप पाटील , आनंद पाटील, किशोर कुडे, महादेवराव समोसे, धनंजय शेलोकार, शुभम भोंगे ,सतीश हजारे ,रुपेश गुल्हाने, ऋषी जगताप ,आशिष शिंदे , अज्जू पठाण ,समीर पाटील ,मयूर डुबे, अविनाश मांडवगणे, मुकुंद माहोरे, दिनकरराव जगताप, अवधूत दिवे, विठ्ठल राव सपाटे ,विनीत टाले, भाऊराव बमनोटे , मुन्ना पनपालीया,अविनाश शेळके, संजय शेंडे ,नंदकुमार मानकर ,मुन्ना मुंदडा, मुकेश राठी, अमोल कडू, हेमंत कडू ,रंजीत घुसळीकर ,अविनाश वानखडे, विशाल रोकडे, सुरज सिसोदे ,सुनील देशमुख ,संजय तायडे ,विनोद तायडे, विलास डुकरे ,राजाभाऊ भोगे, संजय इंगळे, प्रतोब इंगळे, निवृत्ती वैद्य, गोपाल मांडूळकर ,पवन खुरपडे, बबलू भेंडे ,संदीप दावेदार, विजय निमकर, समीर कडू, सलीम पठाण, वैभव पावडे, सुधाकर उईके, अतुल वाघ, मनोज ढोबळे ,गजानन राऊत, डॉ शिंदे, शैलेश निस्ताने, किशोर निस्ताने, शिशिर शेंडे ,राजू धारवाले, संजय सहारे, संजय सावंत, मंजीत रोंघे,प्रशांत सबाने ,संतोष पळसापुरे, कविष गावंडे, प्रफुल कडू यांच्यासह शेतकरी,शेतमजूर व आदी सहभागी झाले होते.
———