आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी: नव्याने स्थापन झालेल्या महालक्ष्मी सहकारी सूतगिरणी मर्यादित,आर्वी, ता.आर्वी,जि.वर्धा च्या अध्यक्षपदी आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री संदीपभाऊ काळे यांची एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून डॉ.रवींद्रजी सोनटक्के यांची सोबतच सर्व संचालकांची निवड या सूतगिरणीच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये झाली.
आर्वी ही कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. आर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन घेतले जाते मात्र उत्पादित कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग आर्वीमध्ये नसल्यामुळे येथील कापसापासून बनवलेल्या गाठी बाहेर जातात.नव्याने स्थापित महालक्ष्मी सहकारी सूतगिरणीमुळे तयार गाठींवर प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर पक्क्या मालात होऊन आर्वी परिसरात यानिमित्ताने रोजगार निर्माण होईल.सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आर्वी मतदार संघाचा विकासात्मक दृष्टिकोनातून या सूतगिरणीची पायाभरणी करण्यात आली असे प्रतिपादन अध्यक्ष म्हणून बोलताना या सूतगिरणीचे मुख्य प्रवर्तक श्री संदीपभाऊ काळे यांनी केले.या सूतगिरणीच्या नवीन व्यापार चिन्हाच्या अनावरण उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आर्वीचे नवनिर्वाचित आमदार श्री सुमितभाऊ वानखडे यांच्या हस्ते झाले. त्यांनी या सूतगिरणीतून उदात्त हेतू साध्य होत असून याकरिता या सूतगिरणीची पायाभरणी होत असल्याने सूतगिरणीला व्यवसाय करण्यामध्ये कुठलेही प्रकारची अडचण येणार नाही मी व महाराष्ट्र शासन खंबीरपणे श्री संदीपभाऊ काळे यांनी स्थापन केलेले सूतगिरणीच्या मागे उभे राहू असे प्रतिपादन केले. श्री रोहनकर साहेब,उपायुक्त वस्त्रोद्योग विभाग नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सोबतच दुय्यम उपनिबंधक आर्वी श्री संभाजी भोजने साहेब व या सूतगिरणीचे व्यवस्थापक श्री अरुणजी विधळे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी महालक्ष्मी सहकारी सुतगिरणी चे संचालक म्हणून ॲड शोभाताई काळे, श्री प्रफुलकुमार ठाकरे, श्री विजयजी गुल्हाने, श्री मधुकरजी चौकोणे, श्री सुनिलजी इंगोले, श्री मनीषजी तायडे, श्री विनयजी गुडधे, प्रा धर्मेंद्रजी राऊत, श्री मिलिंदजी हिवाळे, श्री प्रज्वलजी कांडलकर, श्री देवेंद्रजी बोके, श्री शंकरजी ढोले, श्री विजयजी अग्रवाल, श्री प्रतापजी ठाकूर, श्री गजाननराव जवळेकर, श्री हेमंतजी मडावी, सौ पुनम काळे, सौ मनीषा उभाड, श्री नितीनजी दिघडे, श्री प्रविणजी शिरपूरकर या सर्वांचे संचालक म्हणून एकमताने निवड झाली.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने श्री संदीपभाऊ काळे यांनी या सूतगिरणीची स्थापना करून कापूस उत्पादन उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न भविष्याच्या दृष्टिकोनातून केला हे निश्चितच सकारात्मक पाऊल असल्याची प्रतिक्रिया या वार्षिक सर्वसाधारण सभे करता उपस्थित झालेल्या भागधारक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.