धामणगाव रेल्वे येथे त्यागमुर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंती साजरी.

veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे : – प्रतिनिधी

त्यागमुर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर संपूर्ण वंचित बहुजन समाजाच्या आई संघर्ष त्याग असलेल्या माणुसकीच्या जिवंत आई म्हणजे माता रमाई देशातील वंचित उपेक्षित घटकांवर अपार माया होती दुःखाचा डोंगर पेलत स्वताचे आयुष्य दुःखात घालून त्या खंबीरपणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या

जय संविधान सन्मान ग्रुप व विवेक विचार मंच धामणगाव रेल्वे च्या वतीने स्वर्गीय दादाराव अडचण हॉलीबॉल मैदान शास्त्री चौक धामणगाव रेल्वे येथे मोठ्या प्रमाणात रमाई महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले यामध्ये भंत्ते डॉ अभय बोधी यांच्या हस्ते बुद्ध वंदना व धम्म प्रवचन तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत भारतीय समाज या विषयावर विवेक विचार मंचाचे महाराष्ट्र प्रमुख सुनील किटकरू यांचे व्याख्यान झाले.

तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कव्वाल भीम गीत गायक दिपाल इंगळे व संविधान मनोहरे यांचा दणदणीत बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष अर्चनाताई रोठे अक्का ,ॲड संचित घोडेस्वार , डॉ अशोक कुचरिया, वैभव बावनकुळे अतुल भोगे, विनोद तिरले , दिपक राठी कार्यक्रमाचे अध्यक्ष जय संविधान सन्मान ग्रुप चे अध्यक्ष प्रशांत मुन होते .

सर्व समाजातील विविध सामाजिक संस्था भारतीय बौद्ध महासभा, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका, डॉ प्रा.विलास पाटील सर,प्रा डॉ नुतनताई शहाकार कु.भाविका बागडे सह नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ अर्चनाताई अडसड रोठे आक्का यांच्या सत्कार करण्यात आला. बुद्ध भिम गिंताचा महासंग्राम या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवि उर्फ दादू मेश्राम, प्रेम मोटघरे, सिध्दार्थ टाले, सदानंद कांबळे, भिमराव सहारे, स्नेहल वानखडे, संदीप रामटेके,कोहिनूर श्रीरामें पियुश श्रीरामे, सीमा मुन, दिपाली जाधव, प्रनिता टाले, माधवी सावध, अरुणा भिल, प्रियांका क्षीरसागर, उन्नती मेश्राम सह अनेक कार्यकर्ते यांनी प्ररिश्रम घेतले

मुख्य संपादक राजू गायकवाड

Google Ad