प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे
समृद्धी महामार्गावर बोरगाव धांदे समोर ते सावळा नजीक पहाटे 6:30 च्या दरम्यान मालवाहतूक वाहनाचा ट्रेलर ला धडक झाल्याने एक युवक गंभीर जखमी झाला तर एक युवक किरकोळ जखमी झाला आहे. चंदू काकडे वय वर्ष 30 मालवाहतूक अशोक लेलँडचा चालक हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे. तर चेतन नेहारे वय वर्ष 20 हा किरकोळ जखमी झाला आहे. दोघेही युवक हे तळेगाव श्यामजी पंत येथील रहिवासी आहे .दोघेही जखमींना ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे आणण्यात आले .प्रथम उपचार नंतर जखमींना यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे