प्रतिनिधी:
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 16 74 ला झाला. 16 77 ला शिवाजी महाराजांनी डचांसोबत एक करार केला. त्यामध्ये महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्रात मौल्यवान वस्तूचा व्यापार करता येईल परंतु माणसांचा व्यापार अर्थात गुलामांची खरेदी विक्री करता येणार नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्ण जगात गुलामांच्या खरेदी विक्रीवर बंदी आणणारे कायदे 18 व्या शतकात झाले परंतु छत्रपती शिवाजी राजांनी सोळाव्या शतकात महाराष्ट्रामध्ये गुलामांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालणारा कायदा करून त्यास प्रतिबंध लावला यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची मानावाविषयी असलेली अपार करुणा व्यक्त होते.
अमरावती येथे ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साय.६ वाजता सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते गंगाधर बनबरे, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि आजची राजसत्ता याविषयावर जाहीर व्याख्यानातून मार्गदर्शन केले ते पुढे म्हणाले
लोकांची व्यक्तीवर निष्ठा नसून ती पदांवर निष्ठा असली पाहिजे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला छत्रपती घोषित केले आणि आपल्या राज्याभिषेक करून घेतला या राज्यभिषेकाच्या माध्यमातून डच इंग्रज पोर्तुगीज या सर्व परकीयांना मी तुमच्या बरोबरीचा या देशाचा राजा आहे हे महाराजांना त्यांना दाखवून द्यायचे होते कारण भारताचा राजा मोगल सम्राट होता छत्रपती शिवाजी महाराज पूर्वी भारताचा कोणीही राजा नव्हता या राज्याभिषेकाच्या माध्यमातून भारताच्या लोकांना आपला राजा मिळाला त्याचबरोबर स्वाधर्मातील धर्मपंडितांना पाय बंद करणे हे शक्य होत नव्हते स्वतः राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांना तथाकथित धर्म. पंडितांना पाय बंद करणे शक्य झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक पैलू वर त्यांनी उजेड टाकला. शिवराज्याभिषेक उत्सव समिती अमरावती द्वारा आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी केले अध्यक्षपदी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आडे. प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. भीमराव वाघमारे, निरंजन गाठेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, जिल्हा ग्रामीण यंत्रणा विभागाच्या प्रकल्प संचालक प्रीतीताई देशमुख, सुप्रसिद्ध कान ना घसा तज्ञ डॉ. बबन बेलसरे,प्रा.अनुप शिरभाते, डॉ. सतीश तराळ,मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गावंडे, जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विन चौधरी, माजी उपजिल्हाधिकारी मनोहर कडू , जिजाऊ ब्रिगेडच्या हर्षा ताई ढोक, प्रतिभा रोडे, संभाजी ब्रिगेडचे मनीष पाटील, दिनेश ठाकरे यांची उपस्थिती होती १ जून ते ६जून दरम्यान झालेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण या कार्यक्रमात करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जुनघरे, तर आभार प्रदर्शन जिजाऊ ब्रिगेडच्या मंजुषा पाथरे यांनी केले या व्याख्यानाला अमरावतीकरांनी भरगच्च प्रतिसाद दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश राऊत, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव संजय ठाकरे, शरद काळे,मनोज सोळंके, राम बावस्कर, मयुर वीघे, दीपक लोखंडे, अभिजीत कणसे, दर्शन शेरेकर, रवी मोहोळ, निकेश वडाळकर, यांच्यासह मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेड समकक्ष संघटनेच्या व आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र प्रयत्न केले