स्थानिक धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये 1929 मध्ये मुख्याध्यापक शंकर जगेश्वर भागवत यांनी शालेय गणेशोत्सवाला प्रारंभ केला. स्वातंत्र्य पूर्वीचा हा गणेशोत्सव आज 2024 पर्यंत सुद्धा उत्साहात सुरू आहे. आज 96 वर्षा पासूनची ही परंपरा सुरूच आहे.येथे नुकतीच श्री गणेशाची से. फ. ला.विद्यालयाचा नाद ढोल ताशा ग्रुप यांच्यातर्फे मोठ्या उत्साहात गजरात स्थापना झाली.
विद्यालयाचे कलाशिक्षक अजय जिरापुरे यांनी या गणेशोत्सवाला विद्यालयाच्या दर्शनी फलकावर रंगीत खडूच्या च्या माध्यमातून ” मंगलमूर्ती ” गणेशाचे चित्र रेखाटन केले आहे. सोबतच गणपती मूर्तीच्या मागचा देखावा सुद्धा इको फ्रेंडली पद्धतीने कला शिक्षक अजय जिरापुरे व त्यांच्या मार्गदर्शनमधून विद्यार्थिनींनी साकार केला आहे. विठ्ठल मंदिर प्रतिकृती ही साध्या कागदी पुठ्ठेच्या माध्यमातून साकार केली. महाराष्ट्राचे लाडके दैवत विठ्ठल व वारकरी हे आपली संस्कृती आपला अभिमान आहे.. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते…आपल्या प्रतिकृतीच्या माध्यमातून सादर केला..
कला शिक्षक अजय जिरापुरे आणि त्यांना मदत करण्यासाठी विद्यालयातील मिडलस्कूल व हायस्कूलच्या विद्यार्थिनी नीलाक्षी खडसे, आराध्या फरकाळे, रिद्धी कडू, तेजल बोंद्रे, लावण्या बांगडे, शर्वरी जाधव, कश्मीरा जगताप, कशीश राठोड, शर्वरी मुळे, वेदांती वैद्य, स्पर्शिका मनोहर इत्यादी विद्यार्थिनींची मदत झाली.. हा देखावा साकार करतानाची एक सुंदर चित्रफित.